Xiaomi च्या किंमतीत मिळवा iPhone 14; बंपर डिस्काऊंटची घोषणा

650514-iphone.jpg
8 ऑक्टोबरपासून सेल

Flipkart Big Billion Days Sale 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या सेलशी संबंधित ऑफर्स आता समोर आले आहेत. यामधील एक ऑफर iPhone 14 शी संबंधित आहे.
iPhone 14 वर ऑफर

iPhone 15 लाँच झाल्यापासून अनेकांच्या विश लिस्टमध्ये iPhone 14 सामील झाला आहे. जर तुम्हीही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सुवर्णसंधी आहे.
50 हजारापेक्षा कमी किंमतीत मिळणार

फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही हा फोन तुम्ही स्वस्तात खरेदी करु शकता. हा फोन 50 हजारांपेक्षी कमी किंमतीत मिळत आहे.
किती आहे किंमत?

iPhone 14 ची सध्याची किंमत 69 हजार 900 रुपये आहे. पण तुम्ही 49 हजार 999 रुपयात खरेदी करु शकता. सोशल मीडियावर कंपनीने हा मोबाइल 4x,xx9 अशी जाहिरात करत आहे.
नो-कॉस्ट EMI

मागील वर्षीच्या सेलमध्ये कंपनीने iPhone 13 ला 50 हजारापेक्षा कमी किंमतीत विकलं होतं. iPhone 14 ला तुम्ही नो-कॉस्ट EMI मध्ये खरेदी करु शकता.
खरेदी करण्याची संधी

जर तुम्ही नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. हा एक वर्ष जुना फोन आहे. ज्यामध्ये तुम्हाला OLED पॅनल मिळतो.
या गोष्टीची घ्या काळजी

या सेलमध्ये अनेक बेनिफिट्स सहभागी आहेत. यामध्ये फ्लॅट डिस्काऊंट, एक्स्चेंज बोनस आण बंक ऑफर यांचा समावेश आहे.
स्पेसिफिकेशन्स काय आहेत?

फोनमध्ये OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा IP68 रेटिंगसह येतो. यामध्ये 12MP + 12MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. तसंच फ्रंटला 12MP चा सेल्फी कॅमेरा आहे.
iPhone 15 च्या तुलनेत कमी फिचर्स

iPhone 14 स्मार्टफोन A15 Bionic चिपसेटवर काम करतो. यामध्ये डायनॅमिक आयलँड आणि USB-C पोर्ट सारखे फिचर्स मिळत नाहीत.


Source link

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top