vivo y02t and vivo y16 price drop second time in a month know the new price – महिन्याभरात दुसऱ्यांदा स्वस्त झाले Vivo चे हे 2 स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत

104123901.jpg

Vivo Y02T आणि Vivo Y16 ची किंमत दुसऱ्यांदा कमी करण्यात आली आहे. याआधी कंपनीने ऑगस्टमध्ये या मोबाईल्सची किंमत कमी केली होती. Vivo Y02T आणि Vivo Y16 अशी या हँडसेटच्या किंमत कमी झाल्याबाबत Vivo ने X वर किंमत दिली. या दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत. फक्त कॅमेरा सेटअपबाबत दोघांमध्ये फरक आहे. त्यानुसार जाणून घेऊया काय आहे नवीन किंमत आणि वैशिष्ट्ये.

Updated Oct 3, 2023 | 12:14 PM IST

Vivo Price Drop
Vivo Price Drop: स्मार्टफोन कंपनी Vivo ने आपल्या दोन बजेट स्मार्टफोन्सची किंमत पुन्हा कमी केली आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा ही किंमत कमी करण्यात आली आहे. Vivo Y02T आणि Vivo Y16 अशी या हँडसेटची नावे आहेत ज्यांची किंमत कमी झाली आहे. Vivo ने X वर ही किंमत कपातीची घोषणा केली आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत. फक्त कॅमेरा सेटअपबाबत दोघांमध्ये फरक आहे. त्यानुसार जाणून घेऊया काय आहे नवीन किंमत आणि वैशिष्ट्ये.

Vivo Y02T आणि Vivo Y16 ची किंमत दुसऱ्यांदा कमी करण्यात आली आहे. याआधी कंपनीने ऑगस्टमध्ये या मोबाईल्सची किंमत कमी केली होती. आता नवीन किंमतीनुसार कंपनीने दोन्ही हँडसेटवर 500 रुपयांनी कपात केली आहे.

बातमीची भावकी

अशी आहे नवीन किंमत

Vivo Y02T आणि Vivo Y16 या मोबाईल्सच्या किमतीत कपात केल्यानंतर, Vivo Y16 ची सुरुवातीची किंमत 10499 रुपये आहे. यात 4GB RAM + 64GB स्टोरेज मिळेल. तर 128 GB स्टोरेज असलेले मॉडेल 11,999 रुपयांना मिळेल. याची जुनी किंमत 10,999 रुपये आणि 12,499 रुपये होती. तर Vivo Y02T ची खरेदी 8,999 रुपयांने केली जाऊ शकतो. त्याची जुनी किंमत 9, 499 रुपये होती. नवीन किंमत Vivo India वेबसाइट, Flipkart आणि Amazon वर उपलब्ध आहे.

स्पेसिफिकेशन

Vivo Y02T आणि Vivo Y16 चे स्पेसिफिकेशन जवळपास सारखेच आहेत. दोन्ही हँडसेटमध्ये 6.51-इंच HD+ रिझोल्यूशन डिस्प्ले, डिस्प्लेमध्ये 270 PPI डेन्सिटी आणि त्याची स्क्रीन ते बॉडी रेशो 82.5 टक्के आहे. प्रोसेसर विषयी बोलायचे झाल्यास या दोन्ही मॉडेलमध्ये MediaTek चा ऑक्टा-कोर Helio P35 चिपसेट आहे. जो IMG PowerVR GE8320 GPU सह येतो. या हँडसेट्समध्ये 4GB रॅम देण्यात आली आहे. हे दोन्ही फोन Android 13 सह FuntouchOS 13 स्किनवर काम करतात.

Vivo Y02T आणि Vivo Y16 चा कॅमेरा

कॅमेरा विभागाबद्दल बोलायचे झाले तर, Vivo Y02T मध्ये 8MP रियर कॅमेरा आहे, तर Vivo Y16 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, दोन सेन्सर 13MP आणि 2MP आहेत. दोन्ही हँडसेटमध्ये 5MP सेल्फी कॅमेरा असून दोन्ही हँडसेटमध्ये 5000mAh बॅटरी आहे.


Source link

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top