जे आहे, ते पुरेसे ताकदवान नाही. त्यामुळे, दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ‘ट्राय’ने येत्या मार्चमध्ये नवे ‘डीएनडी’ म्हणजे डू नॉट डिस्टर्ब हे अॅप्लिकेशन आणण्याचे ठरविले आहे. या निर्णयाचे स्वागत. मात्र, हे नवे अॅप पूर्णपणे बिनचूक, निर्दोष आणि वेगवान असायला हवे. ही काळजी जर ट्रायने घेतली नाही, तर देशातील कोट्यवधी ग्राहक विनाकारण फसवाफसवीच्या जाळ्यातील संभाव्य भक्ष्य बनून राहतील. तसे होता कामा नये. सध्याही ट्रायचे अॅप आहे. मात्र, अँड्राइड प्रणालीच्या फोनमध्ये ते वापरताना अनेक अडचणी येतात. मोबाईल फोन वापरकर्त्यांना येणारे ‘स्पॅम कॉल’ किंवा संदेश यांची या अॅपवर नीट नोंद करता येत नाही. तसेच, ग्राहकांच्या इनबॉक्समध्ये येऊन आदळणारे मार्केटिंगचे फसवे संदेश ‘ट्राय’पर्यंत या अॅपमधून कसे पोहोचवायचे, असा प्रश्न ग्राहकांना पडतो. हे अॅप खरेतर सगळ्याच फोनधारकांना उपयुक्त ठरणारे आहे. मात्र, अॅपलने त्यांचे फोन वापरणाऱ्या ग्राहकांना हे अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यासच नकार दिला आहे. अॅपलची स्वत:ची सुरक्षा व्यवस्था स्पॅम कॉल आणि संदेशांबाबत पुरेशी आहे, असे अॅपल कंपनीला वाटत असावे. मुळात फसवेगिरी करणारे कॉल आणि लघुसंदेश हे ग्राहकांपर्यंत येण्याआधीच थोपविले जाणे आवश्यक आहे. त्यासाठी ट्रायने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची आवश्यकता आहे.
‘ट्रुकॉलर’ या ग्राहकांना नंबर कुणाचा आहे, हे सांगणाऱ्या कंपनीचे सीईओ अॅलन मामेदी यांनी दिलेला इशारा मोलाचा आहे. त्यांच्या मते कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कोणत्याही व्यक्तीचा आवाज हुबेहूब तसाच काढणे शक्य आहे. अशावेळी, ग्राहकांची फसवणूक रोखणे, हे अधिकच मोठे आव्हान आहे. सध्याच्या युगात टेलिमार्केटिंग रोखणे किंवा बंद करणे शक्य नाही. असे विपणन हा अर्थव्यवस्थेचा भागच झाला आहे. मात्र, तंत्रज्ञानाच्या मदतीने बनावट आणि फसवे संदेश तेच फोन क्षणार्धात रोखता यायला हवेत. ट्रायचे हे अॅप्लिकेशन अगदी अचूक आणि ग्राहकांचे संरक्षण करणारे व्हायला हवे.
Source link