JEE Main 2024 Registration Process: लवकरच सुरू होणार जेईई मेन २०२४ परीक्षेची नोंदणी प्रक्रिया; जाणून घ्या अर्ज करण्यासाठी आवश्यक बाबींविषयी

1696673078_maharashtra-times.jpg

JEE Main 2024 Registration: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे लवकरच संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Main) साठी अधिसूचना जाहीर करणार आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील. एनटीएने जारी केलेल्या वार्षिक वेळापत्रकानुसार, जेईई मेन २०२४ या दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. पहिल्या सत्रातील परीक्षा जानेवारी महिन्यात आणि दुसरी परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे.NTA (National Testing Agency) ने जाहीर केलेल्या माहितीनुसार, JEE Main जानेवारी सत्रातील परीक्षा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. तर, एप्रिल सत्रातील परीक्षा १ ते १५ एप्रिल २०२४ या कालावधीत होणार आहे. दोन्ही सत्रांसाठी आवश्यक असणारे प्रवेशपत्र परीक्षेच्या १५ दिवस किंवा एक आठवडा अगोदर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

सदर परीक्षेला बसण्यासाठी, उमेदवारांना अर्ज सुरू झाल्यानंतर jeemain.nta.nic.in या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे. मात्र, तोपर्यंत, उमेदवार जेईई मेन २०२४ बद्दल नोंदणी, वयोमर्यादा, पात्रता आणि आरक्षण निकष तपासू शकतात.

NTA ने जाहीर केलेले परीक्षेचे वेळापत्रक पाह ण्यासाठी येथे क्लिक करा.

पात्रता :

  • JEE Main 2024 परीक्षेला बसण्यासाठी पात्रता निकष ठरवून देण्यात आला आहे.
  • विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा देणारे उमेदवारच परीक्षेसाठी अर्ज करू शकतील.
  • मात्र सदर विद्यार्थ्याचे मुख्य विषय गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र (Physics, Chemistry, Mathematics) म्हणजेच PCM असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर एक वर्षानंतरही अर्ज करू शकतात. उमेदवारांना ही परीक्षा देण्याची संधी जेईई मेनसाठी दोन संधी मिळते.
  • पहिली संधी बारावी झाल्यावर एक वर्षभरात तर, दुसरी संधी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एक वर्षाने उपलब्ध होते.
  • मात्र, जेईई मेनसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.

जेईई मेनच्या टॉप 2.5 लाख उमेदवारांना अ‍ॅडव्हान्ससाठी बसण्याची संधी :

जेईई मेन परीक्षेत टॉप २.५ लाख रँक असलेल्या उमेदवारांना जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी बोलावले जाते. जेईई अ‍ॅडव्हान्स्डमध्ये यशस्वी झालेले उमेदवार आयआयटी, एनआयटी, ट्रिपलआयटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि इतर कॉलेजमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरतात. शिवाय, इंजिनिअरिंग आणि अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परिसखा ग्राह्य धरली जाते.

(वाचा : National Testing Agency ने जाहीर केले २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक, यादिवशी होणार CUET, NEET, JEE आणि UGC परीक्षा)

Source link

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top